Uncategorized

चंद्रपूर : श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य – सीता दिदीजी

श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य – सीता दिदीजी
प्रेस नोट 1

श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य – सीता दिदीजी

राजयोग शांत मन व सुखी जीवनाचे गुढ – सीता दिदीजी

 

 

श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य आहे. विचारांच्या आधारावर कृत्य घडते व वारंवार कृत्याने प्रवृत्ती बनते. म्हणूनच आज समाजामध्ये विराजमान अनिती, अत्याचार, भ्रष्टाचार, भेदभाव व अनैतिकतेला दूर करायचे असेल तर मानवाने राजयोगाच्या माध्यमातून मन शांत होते व मानवाचे जीवन सुखी होते असे वक्तव्य मुख्य वक्ता सीता दिदी यांनी केले. राजयोगा एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशनच्या समाज सेवा प्रभाग तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सुखी जीवन व सुदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारीत अभियानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

चंद्रपूरातील प्रियदर्शनी सभागृहात दि. 1 जूनला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात इंदोरच्या समिता दिदींनी राजयोगाचा अभ्यास करवीला, कोटा राजस्थानच्या उर्मीला दिदींनी श्रेष्ठ कर्मांसाठी प्रतिज्ञा करवली, चंडीगढ पंजाबच्या नेहा दिदींनी अभियानाचा परिचय व उद्देश व्यक्त केला. यावेळी कुंदा दिदींनी मंचासिनांचे तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी अभियानाथ्र्यांचे स्वागत केले. नरेश पुगलीया यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तर चेंबर आॅफ काॅमर्स चे अध्यक्ष सी ए हर्षवर्धन सिंघवी यांनी भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढावा अशी आशा व्यक्त केली. रजनीताई हजारे यांनी ब्रह्माकुमारीजच्या आदर्श जीवन प्रणालीला आत्मसात करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. ब्रह्माकुमारीजच्या चंद्रपूर क्षेत्रीय संचालिका ब्र.कु. कुसुम दिदीजी आपल्या आशिर्वचनातून म्हणाल्याकी ‘मी बदलेल तर, मोहल्ला, गांव, तालूका, जिल्हा, राज्य, देश व बघता बघता विश्व देखील बदलेल म्हणून स्वतःला बदलण्याची गरज आहे’

सदर अभियान जम्मू येथून प्रारंभ झालेले असून भारताच्या 7 प्रांतांमध्ये 7 राजधान्यांसह अनेक शहरांत मानवी जीवनाला सुखी करण्यासाठी व समाजाला सर्व दृष्टीकोनातून सुदृढ बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत 4200 किमी अंतरावर मुंबई येथे याचा समारोप होणार आहे. या अभियानाच्या उपलक्षाने चंद्रपूरात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ‘मातोश्री वृध्दाश्रमाच्या’ वृध्दांनी विविध क्रियाकलाप केले, जिल्हा कारागृहातील कैद्यांना शांत, सुखी व सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली तर लायन्स क्लब व अग्रवाल समाजाच्या सदस्यांना ‘तनाव मुक्त जीवनशैली’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाकरिता परिसरातील अनेक समाजसेवी, पत्रकार, डाॅक्टर, वकील, राजनेता, अधिकारी यांच्यासह मोठया संख्येने नागरीक व महिला उपस्थित होत्या. ब्रह्माकुमारीजच्या सदस्यांनी यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू भाई यांनी केले तर आभार प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी काव्यातून मानले.

प्रेस नोट 2

मी बदललो तर जग बदलेल- कुसूम दिदीजी

जगातील चांगले ते आत्मसात करा – कुसूम दिदीजी

चंद्रपूर

ब्रह्माकुमारीजच्या चंद्रपूर क्षेत्रीय संचालिका ब्र.कु. कुसुम दिदीजी आपल्या आशिर्वचनातून म्हणाल्याकी ‘मी बदलेल तर, मोहल्ला, गांव, तालूका, जिल्हा, राज्य, देश व बघता बघता विश्व देखील बदलेल म्हणून स्वतःला बदलण्याची गरज आहे’. जगात अनेक चांगल्या बाबी आहेत त्या एक एक करून आपण आत्मसात करावयास हव्या तर आपले जीवन सुखी व आदर्श बनेल. सकारात्मक जीवन जगणे ही एक कला आहे आणि त्यासाठी तनावमुक्त जीवन जगण्याची कला शिकविणाÚया राजयोगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे राजयोगा एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशनच्या समाज सेवा प्रभाग तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सुखी जीवन व सुदृढ समाज’ या संकल्पनेवर आधारीत अभियानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

#gallery-1 {
margin: auto;
}
#gallery-1 .gallery-item {
float: left;
margin-top: 10px;
text-align: center;
width: 33%;
}
#gallery-1 img {
border: 2px solid #cfcfcf;
}
#gallery-1 .gallery-caption {
margin-left: 0;
}
/* see gallery_shortcode() in wp-includes/media.php */

चंद्रपूरातील प्रियदर्शनी सभागृहात दि. 1 जूनला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात अभियान समन्वयक सीता दिदीजी बोलतांना म्हणाल्या की श्रेष्ठ व सकारात्मक विचारांनी स्वस्थ समाजाची निर्मीती शक्य आहे. विचारांच्या आधारावर कृत्य घडते व वारंवार कृत्याने प्रवृत्ती बनते. म्हणूनच आज समाजामध्ये विराजमान अनिती, अत्याचार, भ्रष्टाचार, भेदभाव व अनैतिकतेला दूर करायचे असेल तर मानवाने राजयोगाच्या माध्यमातून मन शांत होते व मानवाचे जीवन सुखी होते. इंदोरच्या समिता दिदींनी राजयोगाचा अभ्यास करवीला, कोटा राजस्थानच्या उर्मीला दिदींनी श्रेष्ठ कर्मांसाठी प्रतिज्ञा करवली, चंडीगढ पंजाबच्या नेहा दिदींनी अभियानाचा परिचय व उद्देश व्यक्त केला. यावेळी वनी येथील कुंदा दिदींनी मंचासिनांचे तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी अभियानाथ्र्यांचे स्वागत केले. नरेश पुगलीया यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तर चेंबर आॅफ काॅमर्स चे अध्यक्ष सी ए हर्षवर्धन सिंघवी यांनी भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढावा अशी आशा व्यक्त केली. रजनीताई हजारे यांनी ब्रह्माकुमारीजच्या आदर्श जीवन प्रणालीला आत्मसात करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

सदर अभियान जम्मू येथून प्रारंभ झालेले असून भारताच्या 7 प्रांतांमध्ये 7 राजधान्यांसह अनेक शहरांत मानवी जीवनाला सुखी करण्यासाठी व समाजाला सर्व दृष्टीकोनातून सुदृढ बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत 4200 किमी अंतरावर मुंबई येथे याचा समारोप होणार आहे. या अभियानाच्या उपलक्षाने चंद्रपूरात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ‘मातोश्री वृध्दाश्रमाच्या’ वृध्दांनी विविध क्रियाकलाप केले, जिल्हा कारागृहातील कैद्यांना शांत, सुखी व सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली तर लायन्स क्लब व अग्रवाल समाजाच्या सदस्यांचा ‘तनाव मुक्त जीवनशैली’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.

Source: BK Global News Feed

Comment here