Uncategorized

पीसीआरए युवा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

औरंगाबाद (छावणी) : पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय भारत सरकार) यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, छावणी, औरंगाबाद येथे दि.२७ फेब्रु. रोजी युवा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ‘इंधन संरक्षण की दिशा में छोटे छोटे कदम बहोत बडा परिवर्तन ला सकते है’ या विषयावरती बी.के. केदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका एस. एल. चव्हाण मॅडम तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाश्वत विकास म्हणजे ‘वर्तमान पिढीने आपल्या गरजा पूर्ण करताना नैसर्गिक साधनांचा उपभोग अशा प्रकारे घेतला पाहिजे की भविष्यातील पिढीला त्या कोणत्याही घटीशिवाय उपलब्ध होतील असे पीसीआरए चे बी.के. केदार यांनी विद्यार्थ्यानां मार्गदर्शन केले. युवा जनजागृती कार्यक्रमात पीसीआरएचे डॉक्यूमेंट्री फिल्म दाखवून एलपीजी स्वयंपाकाचा गॅस, विद्युत, पेट्रोल, डीजल आणि पाणी बचतीचे उपायांद्वारे कमीत कमी ३०० रुपयांपर्यंत बचत स्कीमबचतीच्या सादर केली. आजपासूनच आपण विजेची बचत करणे आवश्यक आहे. आज प्रत्येक व्यक्तिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतसुद्धा विजेची आवश्यकता असते व समोरच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या देशातील विजेचे स्त्रोत व लागणारी वीज यामध्ये समोरच्या २५ वर्षांनंतर फार तफावत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आजपासूनच विजेची बचत करणे हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे. ऊर्जेच्या निर्मितीपेक्षा आपण ऊर्जेचा वापर अधिक वेगाने करतो ऊर्जेची बचत केल्याने आपण पैसे वाचवू शकतो असे बी.के. केदार यांनी सांगितले.

Source: BK Global News Feed

Comment here