Uncategorized

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १३ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १३ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !
🏆🥇
नागपूर, ता. २३ फेब्रु. : ‘वनामती’ सभागृहात तेराव्या ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण सोहळ्यात ब्रह्मा कुमारिस – इनकॉन टीम ला ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या प्रभावी कार्याबद्दल राज्य शासनाचा ऊर्जा संरक्षण पुरस्कार सतत चवथ्या वर्षी एनजीओ सेक्टर मध्ये प्रदान करण्यात आला. आयोजित केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार सुधाकर कोहळे, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी चे महासंचालक अभय बाकरे, महाऊर्जा चे महासंचालक कांतीलाल उमप, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. अपारंपरिक ऊर्जेचे दिवंसे दिवस स्वस्त होणारे दर पाहता कचऱ्यापासून वीजनिर्मीतीऐवजी आता कचऱ्यापासून इंधननिर्मितीचा पर्याय चांगला असून त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. तेंव्हा ऊर्जा निर्मितीसोबत इंधनाला कोणता पर्याय होऊ शकतो यावरती विचार करण्यात यावे असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. इथेनॉल वरती बसेस चालविण्याचा चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मिथेनवरती बसेस चालणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बायो फ्युएल मुळे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर चालविण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले. यावेळी उद्योग, अभियांत्रिकी, रसायने, औषधी व अन्न, मेटल व स्टील, कागदनिर्मिती, तेल व रसायने, वस्त्रोद्योग, थर्मल पॉवर, बांधकाम व्यवसाय, स्थापत्य, शासकीय इमारती व सर्वसाधारण क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना व व्यक्तींना, शालेय विद्यार्थ्यांना आदींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमप यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या स्पेर्धेचे परीक्षक प्रा. पी. एस. गंधे, डॉ. सतीशचंद्र जोशी, एस पी सदानंद व नीती भंडारी यांचा शाल श्रीफळ देऊन गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आले. ब्रह्माकुमारीस एजुकेशनल सोसायटी लातूर तर्फे सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी नंदा दीदी, ब्रह्माकुमारी पुण्या दीदी, बीके एनकोन प्रोजेक्टचे ऊर्जा ऑडिटर बी. के. केदार यांनी पुरस्कार स्वीकारला. ऊर्जेचा कुशल उपयोग, गृह ऊर्जा प्रबंधन, ऊर्जा संरक्षण प्रशिक्षणासाठी राज्य स्तरीय जनजागृती अभियान अंतर्गत ब्रह्मा कुमारिस बीके एनकोन प्रोजेक्ट ची सर्टिफिकेट ऑफ मेरिट मध्ये निवड करण्यात आले आहे.

 

Source: BK Global News Feed

Comment here